Friday, April 26, 2024
Homeनगररामपूर सोसायटी निवडणुकीत ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

रामपूर सोसायटी निवडणुकीत ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील रामपूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कै. रावसाहेब साबळे यांच्या आशिर्वादाने आमदार राधाकृष्ण पाटील विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंडळाने 12 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. तर विरोधी दक्षिणमुखी हनुमान जनसेवा मंडळाच्या पदरात एकही जागा न पडल्यामुळे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

रामपूर सोसायटी निवडणूक रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीचा लगेच रात्री उशिरापर्यंत निकाल लागला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस. आर. सराफ यांनी निकाल घोषित केला. ग्रामविकास मंडळाचे विजयी उमेदवार तुकाराम नालकर, चंद्रकांत साबळे, दत्तात्रय लोखंडे, निवृत्ती खळदकर, बाळासाहेब साबळे, नामदेव सरोदे, भाऊसाहेब पठारे, उज्ज्वला साबळे, शोभा नालकर, दशरथ भोसले, रायभान पठारे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती लोखंडे, दत्तात्रय सरोदे, राहुल साबळे, पांडुरंग नालकर, यांनी केले. तर विरोधी दक्षिण मुखी हनुमान जनसेवा मंडळाचे नेतृत्व रावसाहेब पठारे, दत्तात्रय नालकर, विनोद मोरे, शंकर खळदकर यांनी केले. रामपूर सोसायटीत अनेक घडामोडी झाल्या. या संस्थेमध्ये एकूण 408 मतदान असून त्यापैकी आठ मयत आहेत. उर्वरित 381 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या