Friday, April 26, 2024
Homeनगरकाल्याच्या कीर्तनाने श्रीरामनवमी उत्सवाची उत्साहात सांगता

काल्याच्या कीर्तनाने श्रीरामनवमी उत्सवाची उत्साहात सांगता

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शनिवार 9 एप्रिलपासुन सुरु झालेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साही वातावरणात झाली.

- Advertisement -

काल उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी 7 वाजता गुरुस्थान मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी 7.15 वाजता संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक यांनी सहपरिवार समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली.

दुपारी 12 वाजता विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपाध्यक्ष अ‍ॅड.जगदिश सावंत, विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सुरेश वाबळे, डॉ. एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग नासिकचे संजय धिवरे, प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यानंतर 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायं. 6 वाजता विश्वस्त जयंतराव जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी जान्हवी जाधव यांच्या हस्ते श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सायं 6.30 वाजता धुपारती झाली. सायं. 7.30 ते रात्रौ 9.50 अक्षय आयरे, मुंबई यांचा सुस्वागतम रामराज्य नृत्य-नाटिका हा कार्यक्रम संपन्न झाला तर रात्रौ 10.00 वाजता श्रींची शेजारती झाली.

श्रीरामनवमी उत्सवाच्या कालावधीत श्री साईप्रसादालयात सुमारे 1 लाख 75 हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. सुमारे 2 लाख 20 हजार लाडू प्रसाद पाकीटांचा व अल्पोहार म्हणुन सुमारे 1 लाख 15 हजार नाष्टा पाकिटांचा भाविकांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती व श्री साईप्रसाद निवासस्थान आदी निवासस्थानांच्या माध्यमातून सुमारे 18 हजार 500 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवानिमित्त मुंबईसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या 53 पालख्यांतील सुमारे 10 हजार पदयात्रींची श्री साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवास व्यवस्था करण्यात आली होती.

श्रीरामनवमी उत्सव यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपाध्यक्ष अ‍ॅड. जगदिश सावंत व सर्व विश्वस्त यांनी धन्यवाद दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या