Friday, April 26, 2024
Homeनगरगावाचा कायाकल्प संवत्सर परिसरात आल्यावर कळते- रमेशगिरी महाराज

गावाचा कायाकल्प संवत्सर परिसरात आल्यावर कळते- रमेशगिरी महाराज

कोपरगाव |तालुका प्रतिनिधीं| Kopargav

माणसाजवळ ध्येय, आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम तो तडीस नेऊ शकतो हे राजेश परजणे यांनी आपल्या कृतीशील वृत्तीतून सिध्द करुन दाखविले असून गावाचा कायाकल्प कशाला म्हणतात हे संवत्सर परिसरात आल्यानंतर लक्षात येते असे उदगार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरीजी महाराज यांनी काढले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाचा राजेश परजणे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला असून सदस्यपदाच्या कालखंडामध्ये विविध विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रमेशगिरी महाराज यांची राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल तर योगीता पवार यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. उपसरपंच विवेक परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

राजेश परजणे म्हणाले, राजकारणाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल या एकाच उद्देशाने मी माझा प्रवास सुरु केला. जनतेची साथ मिळत गेल्याने मला काम करण्याचा ध्यास लागला. तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली. त्या प्रेरणेतूनच पुढे महानंद, भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन, कॅनरा बँक अशा देश पातळीवरील संस्थांवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे, रणशूर सर यांनीही मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमास खंडू फेपाळे, निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र लोखंडे, दिलीपराव ढेपले, चंद्रकांत लोखंडे, सोमनाथ निरगुडे, भरत बोरनारे, ज्ञानदेव कासार, लक्ष्मण परजणे, सूर्यभान परजणे, बाळासाहेब दहे, केशव भाकरे, बापू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नामदेवराव पावडे, संभाजी आगवन, अनिल आचारी, संतोष भोसले, विजय आगवन, रमेश बोरनारे, दत्तात्रय परजणे, बाबुराव मैद, डॉ. घोरपडे, मुख्याद्यापक फैय्याजखान पठाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्त उपस्थित होते. खंडू फेपाळे यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या