Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बृहन्मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे….

- Advertisement -

राज्यपालांच्या आदेशानुसार ही नियुक्ती झाली आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav ) यांना पदावरुन हटवण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी दिले होते.

म्हाडाची (MHADA) घरे हस्तांतरीत न झाल्याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभापतींनी महापालिका आयुक्तांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला (MHADA) वर्ग करण्याचा नियम आहे. महापालिकेने त्याचे उल्लंघन केले. या संदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली.

त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश काल देण्यात आले होते. आज मनपा आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या