Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारकडून जलयुक्तची चौकशी सूडबुद्धीने - माजी मंत्री राम शिंदे

सरकारकडून जलयुक्तची चौकशी सूडबुद्धीने – माजी मंत्री राम शिंदे

पुणे | Pune

जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र तरीही त्या योजनेची चौकशी केली जाते आहे.

- Advertisement -

त्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले होते. आकस बुद्धीने किंवा सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे, असा आरोप माजी जलसंधारण मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत कॅगने भ्रष्टाचार केला, असे म्हटलेले नाही. पण खर्च काय झाला याबाबतच्या सूचना दिल्या आहे. या योजनेत स्थानिक पातळीवर पूर्ण सहभाग होता. ठाकरे सरकारने आकसबुद्धीने ही चौकशी केली. तरी त्यात काही निष्पन्न होणार नाही, विश्वासही माजी मंत्री राम शिंदेंनी व्यक्त केला आहे.

या योजनेसाठी युनिक अकादमी आणि रिसर्च सेंटर यांनी अहवाल दिला होता. हायकोर्टाच्या आदेशानुसार एक समिती गठीत केली होती. मात्र या समितीने कोणताही आरोप केलेला नव्हता. यात अनेक तज्ज्ञांची मतही घेतली गेली.

या योजनेतंर्गत पाणी संवर्धन, पाणी माथ्यावर जतन केलं आहे. जलयुक्त शिवार ही योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. लोक समाधानी झाली आहेत. मग त्यात भ्रष्टाचार कसा काय झाला? असा प्रश्न माजी मंत्री राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या