Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशराम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून देणग्यांचे संकलन

राम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून देणग्यांचे संकलन

नवी दिल्ली –

अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून

- Advertisement -

देणग्यांचे संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय यांनी दिली. निधी संकलन हे मकर संक्रांतीपासून सुरू होणार असून ते माघ पौर्णिमेपर्यंत (27 फेब्रुवारी) सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अयोध्येत ठिकाणी उभारण्यात येणार्‍या भव्य मंदिरासाठी देशभरातील प्रत्येर राम भक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जातील, असं चंपत राय यांनी सांगितलं. मकर सक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार्‍या निधी संकलन कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या 11 कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहेत. तसंच त्यांना श्री राम जन्मभूमीशी जोडून त्याचा प्रचार करतील. देशातील प्रत्येक जाती, मताच्या, पंथाच्या आणि संप्रदायाच्या लोकांच्या सहयोगातूनच राम मंदिर वास्तवात एक राष्ट्र मंदिराचं रूप घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात येणार्‍या अभियानात भक्तांनी स्वैच्छिकरित्या केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. तसंच यासाठी 10, 100 आणि 1 हजार रूपयांचे कुपन्स उपलब्ध असतील. कोट्यवधी घरांमध्ये या भव्य मंदिराची प्रतीमा पोहोचवली जाणार असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या