Saturday, April 27, 2024
Homeनगरराळेगण सिध्दीसह साकळाई योजना राबविण्यासाठी शासनदरबारी हिरवा कंदील

राळेगण सिध्दीसह साकळाई योजना राबविण्यासाठी शासनदरबारी हिरवा कंदील

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

राळेगण सिध्दीसह साकळाई योजना राबविण्यासाठी अखेर महाआघाडी शासन दरबारी हिरवा कंदील मिळाला असून या दोन्ही योजनांसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी शनिवारी आ. निलेश लंके, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी राळेगणसिद्धीसह 9 गावांच्या योजना व साकळाई 14 गावांच्या योजनांच्या संदर्भात चर्चा केली. या दोन्ही योजनांमुळे पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळणार आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांनी सरकारकडे पाठपुरावा करून मार्गी लावला असून याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे या योजनांसाठी निधी लवकरच उपलब्ध करावा, अशी मागणी करत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले असून हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत. तर या दोन्ही योजनांचा फायदा पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्याला होणार आहे. याबाबत गेल्या आठवड्यात जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांनी पाठपुरावा केल्यानंतर पुण्यातील बैठकीत हिरवा कंदिल देऊन सर्वेक्षण आदेश दिले आहेत. त्यामुळे पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांना याचा फायदा होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या राळेगणसिद्धीसह 14 गाव पाणीपुरवठा योजना व साखळाई योजना यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जलसंपदा ना. जयंतराव पाटील यांच्याशी आ. निलेश लंके यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती व शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी राळेगणसिद्धीसह 9 गावांच्या योजना व साकळाई 14 गावांच्या योजनांच्या संदर्भात कुकडीचे मुख्य कार्यकारी अभियंता धुमाळ व आ. निलेश लंके यांनी चर्चा केली.

याबाबत गेल्या आठवड्यात राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. लंके यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या पुण्यातील बैठकीत हिरवा कंदील देऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

दुष्काळी पारनेरची ओळख पुसण्यासाठी पारनेरच्या हक्काचे पाणी व जलसंधारण कामांना प्राधान्य देण्यात येणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या इच्छेनुसार राळेगण सिध्दीबरोबर साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांना याचा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार लंके यांनी मतदारांना दिलेला शब्द आ.निलेश लंके लवकरच पुर्णत्वास नेणार ही विश्वासर्हता जनतेच्या चर्चेतून पाहावयास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या