Saturday, April 27, 2024
HomeनगरRakshabandhan 2021 : सलाम पोस्टमनकाका...! सुट्टीच्या दिवशीही पोस्टमन बांधवांकडून राखी वितरण

Rakshabandhan 2021 : सलाम पोस्टमनकाका…! सुट्टीच्या दिवशीही पोस्टमन बांधवांकडून राखी वितरण

कर्जत | प्रतिनिधी

नेहमीच डाक अर्थात टपाल पोहोच करणारे डाकिया म्हणजे पोस्टमन (Postman) हे करोना (COVID19) काळातही आपली सेवा बजावत आहे. यावेळी राखी पौर्णिमा (Rakshabandhan) रविवारच्या (Sunday) सुट्टी दिवशी आली. मात्र पोस्टमन दादांकडून राखी वाटप करण्याचे काम केले. आपल्या भावाला लाडक्या बहिणीकडून आलेल्या राख्या देताना अनेकांनी पोस्टमनला देत आहेत.

- Advertisement -

अहमदनगर (Ahmednagar) डाक विभागाचे प्रवर अधीक्षक एस रामकृष्णा, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, संदीप हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचे नियम पाळत पोस्टमन काम करत आहेत.

कर्जत उपविभागात चंद्रकांत झेंडे, रावसाहेब चौधरी, शंकर कडभने, किरण शिंदे, दिलीप खरात, अविनाश ओतारी, प्रदीप कोकाटे, जगदीश पेनलेवाड, बळी जायभाय, महेश दांगट, उत्तम शिरसाट यांच्या नियंत्रणाखाली पोस्टमन बांधव काम करत आहेत. सुनील धस, बापुराव पंडित, आर. के. कुलकर्णी, आनंद कात्रजकर, संतोष गदादे, वेदशास्त्री वाकळे, रनेश काळे, भिवसेन खरात आदी पोस्टमन बांधवांकडून टपाल वाटपाचे काम सुरू आहे. यावेळी दशरथ अनारसे, कैलास भुजबळ, एस. ए. लबडे, दीपक काळे, भैरू झरेकर, तात्यासाहेब समुद्र, दादा धस, तुषार डावरे, युवराज राऊत, सर्फराज शेख, दशरथ काकडे, कल्याण भोसले, पाराजी दरेकर, बापु कांबळे, भरत दाताळ, उत्तरेश्वर मिसाळ, प्रतीक्षा काकडे, सलिम शेख, बाळासाहेब गायकवाड आदीचे सहकार्य लाभले.

कर्जत उपविभागात कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नान्नज, खर्डा, काष्टी, श्रीगोंदा कारखाना, राशीन, मिरजगाव आदी कार्यालयांअंतर्गत राखी वाटपाचे काम झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या