Sunday, April 28, 2024
Homeनगरदुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे करावी लागते कसरत

दुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे करावी लागते कसरत

राजुरी |वार्ताहर| Rajuri

राजुरी-बाभळेश्वर रस्त्यावरील (Rajuri-Babhaleshwar Road) खड्ड्यांमुळे (Pits) रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसह (Students) दुचाकीस्वारांनाही (Biks) या रोड वरून प्रवास करताना मोठी कसरत करून आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र सध्या राजुरी ते बाभळेश्वर चौकापर्यंत (Rajuri to Babhaleshwar Chowk) पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर ते बाभळेश्वर हा रोड (Shrirampur to Babhaleshwar Road) रहदारीसाठी सध्या अडचणीचा ठरत आहे. नांदूर, यादव मळा, ममदापूर, राजुरी व बाभळेश्वर चौकापर्यंत या रोडवर खड्डेच खड्डे (Pits) पडले आहे. हे खड्डे अनेक वेळेस माती मिश्रित मुरूम टाकून बुजवलेले आहे. मात्र रहदारीचा रस्ता असल्यामुळे हे खड्डे ताबडतोब रिकामे होऊन पुन्हा खड्डे (Pits) दिसू लागतात. त्यातच सध्या पावसाचे दिवस सुरू असून या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना याचा मोठा फटका बसत आहे. प्रवाशांना अक्षरशा आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या रोडच्या कडेच्या कपारी उघड्या पडल्यामुळे खाली घेतलेले वाहन पुन्हा रोडवर आणण्यात मोठी कसरत करावी लागत आहे.

शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यामुळे घसरून पडत आहे. त्यामुळे या रोडचे खड्डे हे मुरूम व माती टाकून न बुजवता खडी व डांबर टाकून बुजवावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी सुलभ होण्यासाठी काम करणार्‍या ठेकेदारांना सूचना कराव्यात, अशी मागणी या प्रवासी वर्गाने केली आहे. हे खड्डे न बुजवलेल्या वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या