Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपश्चिम राजस्थान आणि पंजाब मधून मान्सूनचा परतीचा प्रवास

पश्चिम राजस्थान आणि पंजाब मधून मान्सूनचा परतीचा प्रवास

पुणे |प्रतिनिधी|Pune

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी राजस्थानच्या बहुतांश भाग, उत्तर प्रदेश, आणि मध्य प्रदेशच्या

- Advertisement -

काही भागातून परतला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 28 सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत त्याने परतीचा प्रवास सुरू केला होता.

पावसाने दिलेली उघडीप, वाऱ्याची बादलेली दिशा, हवेतील आर्द्रता कमी झाल्याने मॉन्सून वायव्य भारतातून माघारी फिरला आहे. उत्तर प्रदेशातील बहारीच, मध्य प्रदेशातील ग्वालियर, राजस्थानच्या सवाई माधवपूरपर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनचा परतीचा वेगाने झाला आहे. देशाच्या इतरही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या