Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'राजपथ'चे नाव आता 'कर्तव्यपथ'; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

‘राजपथ’चे नाव आता ‘कर्तव्यपथ’; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते आज संध्याकाळी सेंट्रल व्हिस्टा अवेन्युच्या (Central Vista Avenue) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisement -

सेंट्रल विस्टा अवेन्यु हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रसंगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच ‘राजपथ’चे नाव ‘कर्तव्यपथ’ करण्यात आले .

संपूर्ण देशाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे . दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इंडिया गेटवरील सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले होते.

इंडिया गेट वरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवन परिसराला ‘कर्तव्य पथ’ असे नामकरण करण्यात आले आहे.

सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण होणार असून सध्या प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. गेल्या 20 महिन्यांपासून बंद असलेला हा भाग आता नागरिकांसाठी खुला होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या