Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिटको तोडफोड प्रकरण : ताजणेंना न्यायालयीन कोठडी

बिटको तोडफोड प्रकरण : ताजणेंना न्यायालयीन कोठडी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

बिटको हॉस्पिटल (Bytco Hospital) तोडफोडप्रकरणी स्वतःहून अटक झालेले राजेंद्र ताजणे (Rajendra Tajane) यांना आज न्यायालयात (Court) उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे…

- Advertisement -

करोनाकाळात बिटको रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही म्हणून नगरसेविका सीमा ताजणे (corporator Seema Tajane) यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी दिनांक 15 मे रोजी रुग्णालयाच्या काचेच्या प्रवेशद्वारात इनोव्हा कार घुसवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

बिटको तोडफोड प्रकरण : ताजणे अखेर पोलिसांना शरण

त्यानंतर ताजणे हे तब्बल अडीच महिने फरार होते. दरम्यान ताजणे हे स्वतःहून नाशिकरोड पोलीस स्थानकात (Nashikroad Police Station) हजर झाले. त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ताजणे यांची रवानगी आता मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या