Friday, April 26, 2024
Homeनाशिक...यामुळे राजेंद्रसिंह नाशिकसंदर्भात निर्धास्त

…यामुळे राजेंद्रसिंह नाशिकसंदर्भात निर्धास्त

नाशिक nashik

पर्यावरण खात्याने अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या ब्रह्मगिरीच्या (brahmagiri) डोंगराचे बेकायदा उत्खननाने आणि अनिर्बंध भूसुरुंगांनी लचके तोडले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या सपाटीकरणाने पायाखालची माती सरकत आहे आणि धक्क्यांनी डोंगरमाथ्यावरील आवरणही निखळू लागले आहे. मात्र नाशिक (nashik) संदर्भात जलपुरुष राजेंद्रसिंह (rajendra singh)निर्धास्त

- Advertisement -

आहे. कारण जिल्हाधिकारींनी त्यांना नाशिकचे हे वैभव कायम राहिल, असे आश्वासन दिले आहे.

नाशिकमधील निर्बंधाबाबत आज मुंबईत निर्णय

नाशिकमध्ये जलपुरुष राजेंद्रसिंह rajendra singh यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, नाशिकची ओळख गोदावरी व ब्रह्मगिरीमुळेच आहे. येथील हे वैभव कायम राहण्यासाठी नाशिक प्रशासनाकडून चांगले काम होत आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले (eknath dawale) यांनी यासाठी मोठे काम केले होते. त्यामुळे गोदावरी (godavari) व ब्रह्मगिरीच्या (brahmagiri)संरक्षणासंदर्भात आम्ही निर्धास्त आहोत. जिल्हाधिकरी सुजर मांढरे यांनीही आम्हाला यासंदर्भात आश्वासीत केले आहे.

…हा मोठा भ्रष्टाचारच

नद्यांशी सदाचाराचा व्यवहार असला पाहिजे, मात्र सरकार पुराच्या भीतीने घाबरून भिंत बांधत असेल तर सदाचार नसून भ्रष्टाचार आहे असे मत राजेंद्रसिंह यांनी मांडले. राज्यात सहा जिल्ह्यात पुरस्थिती असल्याने नद्यांना भिंत बांधण्याचे जाहीर केले आहे त्यावर टीका करताना राजेंद्रसिंह यांनी नाशिक मध्ये बोलताना टीका केली. मुळात नदीलगत ब्लु- रेड झोन असतो अशा वेळी भिंत बांधणे शक्य नाही मात्र अशा प्रकाराला विरोध करण्यासाठी घोषणा करणाऱ्यांना विधिवत पत्र दिले जाईल असे ते म्हणाले. हे केवळ ठेकेदारांचे हित जपण्याचा प्रकार आहे अशी टीका राजेंद्रसिंह यांनी केली.

केंद्र सरकारच्या नमामी गंगा या प्रकल्पात नदी कार्पोरेट कम्पन्याचे हित जोपासण्याचा उद्देश असल्याची टीकाही त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या