Friday, April 26, 2024
Homeनगरपुढच्या पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका - राजेंद्र काकडे

पुढच्या पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – राजेंद्र काकडे

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

ज्येष्ठनेते घनश्याम शेलार हे कुकडीच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहेत. परंतु, काही नेतेमंडळी पाण्यासारख्या जीवन-मरणाच्या प्रश्नात देखील व्यक्तीद्वेषातून आरोप-प्रत्यारोप करून विषयाला फाटा फोडत आहेत. कुकडीचे दृष्टीपथात असलेले यश व्यक्तीद्वेषाच्या राजकारणामुळे प्रलंबित पाडून कुकडी खालील पुढच्या पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असा आरोप शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी केला आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काकडे यांनी म्हटले आहे की, कुकडीच्या पाण्याचे समन्यायी पाणीवाटप असो अथवा डिंभे-माणिकडोह बोगद्याचा विषय असो तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार हे गेली 35 वर्षे सातत्याने संघर्ष करीत आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या कुकडीच्या आढावा बैठकीत घनश्याम शेलार यांनी धरणपातळीवरील नेत्यांचा रोष पत्करून तालुक्यातील कुकडी पाणीप्रश्न व त्यावरील उपाययोजना पोटतिडकीने मांडल्या.

घनश्याम शेलार यांनी यापूर्वी देखील तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली आहे. परंतु, राजकीय परिणामांची पर्वा न करता कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करणार्‍या घनश्याम शेलारांवर होणारे बिनबुडाचे आरोप कुकडीच्या लाभधारक शेतकर्‍यांसाठी वेदनादायी आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संघर्षाचे यश दृष्टिपथात असताना कुकडीसारख्या जीवन-मरणाच्या प्रश्नात व्यक्तीद्वेषातून आरोप-प्रत्यारोप केल्यास त्या नेत्यांविरोधात प्रसंगी टोकाचा संघर्ष करू, असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी दिला आहे.

वरिष्ठ नेत्यांची सकारात्मक चर्चा

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या कुकडीच्या आढावा बैठकीत घनश्याम शेलार यांनी धरणपातळीवरील नेत्यांचा रोष पत्करून तालुक्यातील कुकडी पाणीप्रश्न व त्यावरील उपाययोजना पोटतिडकीने मांडल्या. वरिष्ठ नेत्यांनी सकारामत्क विचार सुरू केला असताना विरोध अयोग्य

- Advertisment -

ताज्या बातम्या