Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख कराल तर याद राखा

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख कराल तर याद राखा

कर्जत |तालुका प्रतिनिधी/वार्ताहर| Karjat

आंदोलन कोणीही करावेत यास विरोध नाही परंतु राज्याची मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत

- Advertisement -

भाजपातील या वाचाळ वीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल आणि शिवसेनेची ताकद दाखवावी लागेल असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी येथे केले

शिवसेनेच्या पक्ष बांधणीसह सभासद नोंदणीसाठी आज कर्जत तालुक्यात उत्साहात सुरुवात झाली. सकाळी कुळधरण येथे जगदंबा देवीला साकडे घालून कर्जत तालुक्यातील सभासद नोंदणी मोठ्या दिमाखात सुरू केली मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यानंतर कर्जत येथे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभागृहात सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आली

यावेळी जेष्ठ नेते बळीराम यादव, तालुकाप्रमुख दीपक शहाणे महावीर बोरा, तालुका उपप्रमुख सुभाष जाधव राशीनचे शहर अध्यक्ष नाझीम काझी आविनाश जाधव शिवसैनिक उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की आगामी काळात आपल्याला अधिक सक्षम पणे काम करावे लागेल. भाजपाचे काही लोक सध्या स्वतः च्या प्रसिध्दीसाठी थेट मुख्यमंत्री यांच्या वर एकेरी भाषेत टीका केली करत असून ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि यामधून आलेल्या नैरश्या मधून ते शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत आहेत त्यांना अजूनही राज्यांमध्ये सत्तेवर येण्याचे स्वप्न पडत आहेत.

परंतु हे सरकार पाच वर्षे शिकणार असून पुढील सत्ता देखील शिवसेनेची येणार आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना सध्या काही काम नाही आणि पुढेही काम राहणार नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता मात्र त्यांच्यावर होणारी एकेरी नावाची टीका कधीही शिवसेना खपवून घेणार नाही कारण मग शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर ते समोर कोण आहेत हे पाहत नाहीत भांडणे वाद मारामार्‍या केसेस या शिवसैनिकांना नव्या नाहीत याचा विसर भाजपवाल्यांनी पडू नये असा इशारा श्री दळवी यनी यावेळी दिला व

असे म्हणत कोरोनाच्या काळात आपल्याला घरोघर जाऊन आपल्याला गर्दी न करता फॉर्म भरून घ्यायचा असून जास्तीत जास्त सभासद करण्याचे आवाहन करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे श्री दळवी यांनी आवाहन केले. तालुका प्रमुख दीपक शहाणे यांनी बोलताना म्हटले की तालुक्यात शिवसेनेची ताकद चांगली आहे मात्र शहरात ती अधिक वाढण्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार करू आगामी नगर पंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्षम पने काम करावे लागेल या दृष्टीने आपल्या सर्वांची जबाबदारी मोठी असल्याचे म्हटले.

यावेळी प्रस्ताविक करताना सुभाष जाधव यांनी शिवसेनेचा प्रोटोकॉलबाजूला ठेवून तालुका प्रमुख शिवसेनेचे नेते यांना पक्षाच्या मंत्र्यांना थेट भेटता आले पाहिजे तालुक्याचे विविध प्रश्न सुटले पाहिजे यासाठी जिल्हाप्रमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच भाजप मधील काही जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आहेत याचा आम्ही निषेध करतो यापुढे त्यांच्याबद्दल आरोप करताना आदराने बोलावे अन्यथा त्या ठिकाणी शिवसैनिक योग्यय उत्तर देतील असा इशारा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या