Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हा मजूर फेडरेशन : मालेगाव तालुका संचालकपदी राजेंद्र भोसले बिनविरोध

जिल्हा मजूर फेडरेशन : मालेगाव तालुका संचालकपदी राजेंद्र भोसले बिनविरोध

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या निवडणुकीत मालेगांव तालुका (Malegaon Taluka) संचालक प्रतिनिधीपदी माजी चेअरमन राजेंद्र लक्ष्मण भोसले (Rajendra Bhosale) यांची बिनविरोध (Unopposed) निवड झाली आहे. युवराज गोलाईत व शंकरराव ठाकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजेंद्र भोसले यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले…

- Advertisement -

जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२४) माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे (Sampatrao Sakale) यांच्यानंतर आता राजेंद्र भोसले यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राजेंद्र भोसले यांचे संपतराव सकाळे,मालेगावचे माजी उपमहापौर सुनील आहेर,युवराज गोलाईत,शंकरराव ठाकरे,कृष्णराव पारखे तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी माघारीसाठी मोठी मुदत मिळाल्यामुळे तालुका गटातून बिनविरोध निवड करण्यासाठी इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न जोमाने सुरू आहे. मजूर संघाच्या २० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान (Voting) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज व छाननीची प्रकिया पूर्ण होऊन गुरुवार, दि. २४ पर्यंत माघारीची मुदत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या