Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : राजस्थान-दिल्ली आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

IPL 2022 : राजस्थान-दिल्ली आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फिरकीपटू कुलदीप यादव आणि यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) पर्पल कॅप डोक्यावर असणारा युझवेन्द्र चहल आज मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या सामन्याच्या निमित्ताने एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही फिरकीपटूंच्या फिरकीच्या जादूचा कस लागणार आहे…..

- Advertisement -

राजस्थान पाचव्या विजयासाठी सज्ज असणार आहे. तर दिल्लीला विजयाचा चौकार मारण्याची संधी आहे. आयपीएल (IPL) गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स सध्या सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीने सहा सामन्यांमध्ये ३ विजय आणि ३ पराभवांसह ६ गुण कमावले आहेत.

मात्र कोलकाताविरुद्ध (KKR) ७ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयामुळे राजस्थान (RR) संघाला लय गवसली आहे. संघाचे फलंदाज आणि गोलंदाज आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात खेळ करत आहेत.

दिल्लीला आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत राजस्थान संघाचे ६ सामने झाले आहेत. यात युझवेन्द्र चहल १७ बळी टिपून आघाडीवर आहे त्याच्यापाठोपाठ कुलदीप यादव १३ बळी टिपून दुसऱ्या स्थानी आहे.

दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

राजस्थान संघाने ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांची कमाई केली आहे. जोस बटलरने कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) शानदार शतके झळकावली आहेत. ३७५ धावांसह आरामको ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयलसचाच फिरकीपटू युझवेन्द्र चहल आरामको पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. चहलची जादुई फिरकी आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरची ताबड्तोड आणि आक्रमक फलंदाजीला पूर्णविराम लावण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला नव्या रणनीतीसह आज मैदानात उतरावं लागणार आहे.

रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फलंदाजी आणि गोलंदाजीतील सुमार कामगिरी पाठोपाठ करोनाच्या (Corona) विळख्यात सापडला आहे. याचा प्रत्यय दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाबकिंग्ज लढतीदरम्यान आला होता. आता दिल्ली संघाच्या विजयाची संपूर्ण मदार पृथ्वी शॉ, कर्णधार रिषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या खांदयावर असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवकडे आक्रमक जोस बटलरला रोखण्याचे आव्हान असणार आहे. त्याला साथ देण्यासाठी अक्षर पटेल , ललित यादव यांच्याजोडीला मुस्ताफिझूर रहेमान, शार्दूल ठाकूर, खलील अहमद हे गोलंदाज आहेत.

दिल्ली आणि राजस्थान आतापर्यंत एकूण २४ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यामध्ये दोन्ही संघाना १२ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या