राजस्थानात CM गेहलोतांना टक्कर देणारे राजेंद्रसिंह गुढा शिंदेंच्या शिवसेनेत

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

महाराष्ट्रा ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. कधीकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे सहकारी राजेंद्रसिंह गुढा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत.

माझा आशीर्वाद नसता, तर गहलोत कधीच मुख्यमंत्री झाले नसते, असा दावा गुढा यांनी नुकताच केला होता. मला वसुंधरा राजेंनी तुरुंगात टाकलं, अन् त्यांच्या बातम्या येणंच थांबलं, त्यामुळे गहलोतांनी मला जेलमध्ये टाकलं, तर त्यांच्याही चर्चा बंद होतील, असं गुढा म्हणाले होते. २४ जुलै रोजी विधानसभेत लाल डायरी झळकवल्याबद्दल बडतर्फ झालेल्या गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

यावेळी या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राजेंद्र गुढा यांचे शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचे नाव गाजले आहे. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता. आता या गुणाचे मिलन झाले आहे.

मी एवढेच सांगेन की, मागच्या वर्षी इथले मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले होते. त्यांनी सांगितले होते की, तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. पण त्यांनीच तुमचे मंत्रीपद काढून घेतले. याचे उत्तर जनता त्यांना देईल. तुम्ही मंत्रीपद सोडले. पण सत्य सोडले नाही, यासाठी तुमचे कौतूक. तुम्ही जसा मंत्रीपदाचा त्याग केला, तशीच वर्षभरापूर्वी मी देखील सत्ता सोडली. मंत्रीपद सोडले आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्येचा त्याग केला, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *