Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयराजस्थान राजकारण : 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं',...

राजस्थान राजकारण : ‘सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं’, सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | New Delhi

राजस्थानातील गेहलोत सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज जयपूरच्या फेअरमॉन्ट या हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पाठ फिरवली आहे. आज झालेल्या बैठकीत 102 आमदार उपस्थित होते. या बैठकीत सचिन पायलट यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी सर्व आमदारांनी केली असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हक्कलपट्टी करण्यात आली असल्याची घोषणा कॉंग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. तसेच त्यांचे प्रदेश्द्याक्ष पद देखील काढून घेण्यात आले आहे.

रणदीप सुरजेवाला बोलतांना म्हणाले, भाजपने राजस्थानच्या जनतेने निवडलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने सत्ता, पैसा आणि शक्तीचा गैरवापर करत इडी आणि इन्कम टॅक्स विभागाचा गैरवापर करून काँग्रेसच्या आणि अपक्ष आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केले आहे.

तसेच सचिन पायलट यांच्या सोबत विश्र्वेंद्र सिंह आणि रमेश मीना यांना देखील मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सचिन पायलट यांच्या हकालपट्टी नंतर त्यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “सत्य को परेशान किया जा सकता हैं पराजित नही |”

- Advertisment -

ताज्या बातम्या