Wednesday, April 24, 2024
Homeनगररांजणखोल येथे भाजपचे घंटानाद आंदोलन

रांजणखोल येथे भाजपचे घंटानाद आंदोलन

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

भाविकांसाठी व व्यवसाय करणार्‍यांसाठी मंदिरे खुली किंवा उघडी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळा-प्रवरा वीज संस्थेचे ज्येष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील श्रीहनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे विशेषतः शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजापूरचे तुळजा भवानी मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर तसेच वाकडीचे खंडोबा मंदिर आदी मंदिरे भाविकांसाठी व व्यावसायिकांसाठी खुली करण्यात यावी.

यासाठी श्री हनुमान मंदिराबाहेर घंटानाद करून दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा देऊन आघाडी सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी सरपंच चांगदेव ढोकचौळे, उपसरपंच परविन शेख, प्रकाश शिरसाठ, अप्पासाहेब डांगे, निवृत्ती दोंड, रामकृष्ण दोंड, कर्णा ढोकचौळे, भाऊसाहेब ढोकचौळे, अनिल ढोकचौळे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, राजू गायकवाड, निलेश जाधव, सिद्धार्थ बागुल, लक्ष्मण कुलथे, शिवदास वाघ, गंगाधर ढोकचौळे, प्रविण ढोकचौळे, यांच्यासह रांजणखोल परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या