Friday, April 26, 2024
HomeUncategorizedरजनीकांत आता घेतात इतकं मानधन

रजनीकांत आता घेतात इतकं मानधन

मुंबई- नशीब आणि मेहनतीची खेळी कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं पुरतं आयुष्य बदलते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता रजनीकांत. हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वात नावारुपास आलेल्या आणि प्रत्येक चित्रपटातून विक्रम प्रस्थापित करणार्‍या या सुपरस्टारचा आज वाढदिवस. थलैवा म्हणा किंवा आणखी काही, रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला शब्दांत व्यक्त करणं निव्वळ अशक्यच.

एकेकाळी बस कंडक्टरचं काम करणारे हेच रजनीकांत सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. माध्यमांमध्ये असणार्‍या चर्चांनुसार असं कळत आहे, की ब्लॉकबस्टर कबाली या चित्रपटासाठी त्यांनी 40 ते 60 कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. तर, खिलाडी कुमारसोबतच्या 2.0 या मागील वर्षीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठीही त्यांनी घसघशीत मानधन आकारल्याचं सांगण्यात येतं. अंदाजे मानधनाचा हा आकडा 80 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या