Sunday, May 5, 2024
Homeनगरसिव्हिल आग : डॉ. पोखरणांचे निलंबन व पदस्थापना शासन स्तरावरच

सिव्हिल आग : डॉ. पोखरणांचे निलंबन व पदस्थापना शासन स्तरावरच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी (Ahmednagar civil hospital fire) निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (Dr. Sunil Pokhrana)….

- Advertisement -

यांचे निलंबन रद्द करून त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे गुरूवारी राजभवनाकडून (Rajbhavan) स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या (icu ward fire) घटनेप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. तसा आदेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी वैभव ग. कोष्टी यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 च्या पोटनियम (5) खंड (क) अन्वये डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यांना शिरूर (जि. पुणे) येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे, असे त्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजभवनाने काय म्हटलं आहे?

‘अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ सुनील पोखरणा यांनी दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरुन राज्यपालांकडे दाद मागितली होती.

या संदर्भात राज्यपालांनी दिनांक १६ मार्च २०२२ रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती तसेच या सुनावणीसाठी अर्जदार डॉ. सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन दिनांक १५ मार्च २०२२ रोजीच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरुर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले. त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली है वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.’

- Advertisment -

ताज्या बातम्या