Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशRAISE 2020 : पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन

RAISE 2020 : पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या RAISE-2020 या शिखर परिषदेत, एमआयटीच्या कॉम्पुटर सायन्स विभागाच्या संचालक दैनियेला रुस, गुगल रिसर्च इंडियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे संचालक डॉ. मिलिंद तांबे आयबीएम इंडीया चे व्यवस्थापकीय संचालक, संदीप पटेल, यु जी बर्कले चे डॉ. जोनाथन रसेल आणि जागतिक आर्थिक मंचाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या प्रमुख अरुणिमा सरकार यांच्यासारखे दिग्गज मान्यवर सहभागी होणार आहेत. इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच नीती आयोगाने, कृत्रिम बुद्धीमत्तेवरील ही जागतिक आभासी परिषद(RAISE 2020) म्हणजेच ‘सामाजिक सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर’ या विषयावर 5 ते 9 ऑक्टोबर या काळात आयोजित केली आहे.

- Advertisement -

RAISE 2020 विषयी

RAISE 2020 ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पहिलीच जागतिक परिषद असून सामाजिक परिवर्तन, सामावेष्ण आणि सक्षमीकरण यासाठी भारताचा दृष्टीकोन आणि आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग आणि नीती आयोगाने ही परिषद आयोजित केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातल्या जागतिक भागीदारीविषयी प्रा रस या परिषदेत आपली मते मांडतील. भारत जून 2020 मध्ये या भागीदारीत सहभागी झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान अधिकारी डॉ रोहिणी श्रीवास्तव कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी तयार असे मनुष्यबळ तयार करण्याविषयीच्या सत्रात बोलतील. त्यांच्यासह इतरही मान्यवर वक्ते या चर्चेत भाग घेतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर यावरील संशोधनाबाबत डॉ मिलिंद तांबे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासासाठी वापर करण्यातली आव्हाने आणि संधी या विषयावर संदीप पटेल मार्गदर्शन करतील. त्याशिवाय, ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा आणि सेंटर फॉर डिजिटल फ्युचर चे अध्यक्ष आर चंद्रशेखर यांच्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करतांना मानवाला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज’ या विषयावर परिसंवाद होईल. तसेच, ‘कृत्रिम बुद्धिमता संशोधन- प्रयोगशाळा ते बाजार’ या विषयावर होणाऱ्या विशेष सत्रात, भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार, प्रा विजय राघवन यांचे भाषण होईल. त्याशिवाय भारतातील विविध बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांचे संस्थापक आणि कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील तज्ञांची वेगवेगळ्या विषयावरील विशेष सत्रे यावेळी आयोजित केली जाणार आहेत.

आतापर्यंत, 123 देशांतील अध्ययन, संशोधन आणि सरकारी प्रतिनिधी अशा 35,034 लोकांनी या RAISE 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

RAISE 2020 चे संकेतस्थळ: http://raise2020.indiaai.gov.in/

RAISE 2020 शिखर परिषद (http://raise2020.indiaai.gov.in/) चर्चा आणि सहमतीच्या मार्गाने माहितीचे भांडार निर्माण करणारे एक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या