पावसाअभावी शेतीची मशागतीची कामे खोळंबली

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

तब्बल तीन वर्षानंतर रोहिणी, आर्द्रा आणि मृग नक्षत्र कोरडे चालल्याने नेवासा (Newasa) तालुक्यातील सलाबतपूर (Salabatpur) परिसरातील शेतीची मशागतीची (Agriculture Cultivation) कामे खोळंबली असून विठुरायाच्या दर्शनाचीही ओढ लागल्याने शेतीची कामे उरकावी म्हणून लवकर पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला वारकर्‍यांनी साकडं घातलं.

शिर्डीत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय; मंत्रिमंडळाचा निर्णय

मागील वर्षी 28 मे रोजी झालेल्या पावसावरच कपाशी लागवडी (Cotton Cultivation) 15 जून दरम्यान पूर्ण झाल्या होत्या. तर बाजरी (Millet) व सोयाबीन (Soybeans) पेरणी जुनच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या होत्या. एकंदरीत मागील वर्षी जुन अखेर खरीप पेरणीचे कामे आटोपून बहुतांशी वारकरी हे पांडुरंगाच्या भेटीसाठी दिंड्यामध्ये सहभागी झाले होते. यावर्षी मात्र चित्र वेगळंच निर्माण झाल्याने शेतकर्‍यांच्या गोटात चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. त्यातच अद्यापही उष्णतेची काहिली कमी झालेली नाही.

जिल्हाध्यक्ष फाळकेंच्या घराला फासले काळे

दरवर्षीपेक्षा यंदा उष्णतेतील आर्द्रतेचे (Humidity in Heat) प्रमाण कमाल दिसून आले. एवढे ऊन व उष्णता कधीच जाणवली नसल्याचे जुने जाणते सांगतात. त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भयंकर चक्रीवादळाचा (Cyclonic Storm) तडाखा बसल्याने पावसाबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. जर पाऊस लांबला तर शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी रोहिणी, आर्द्रा व आता मृगही कोरडा जात असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे .

विकासाच्या कामांची दोरी सरकारनेच कापली !

एकीकडे पावसाची (Rain) ओढ तर दुसरीकडं पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने शेतकरी (Farmer) वारकर्‍यांची मात्र द्विधा अवस्था झाली आहे.

चढ्या दराने कपाशी बियाणे विक्री भोवलीनिपाणीवडगावच्या पवार हत्या प्रकरणात कारखान्याच्या माजी अध्यक्षाचा सहभाग


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *