Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआठ दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशकात पुन्हा 'मुसळधार'

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशकात पुन्हा ‘मुसळधार’

नाशिक/ नाशिकरोड | प्रतिनिधी

आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर आज दुपारी नाशिक शहरासह नाशिकरोड, पंचवटी, द्वारका, मुंबई नाका सातपूर, शिवाजी नगर, पाथर्डी फाटा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांनी आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला.

- Advertisement -

दुपारी अडीच वाजेपर्यंत नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. मात्र, त्यानंतर तीन वाजेपासून पावणेचार वाजेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

नाशिक परिसरातील बिटको चौक, सुभाष रोड, महात्मा गांधी रोड, अनुराधा थियेटर परिसर आर्टिलरी सेंटर रोड, दत्ता मंदिर रोड आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसर जलमय झाला.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले तसेच भाजीपाला विक्रेत्यांसह व्यावसायिक आणि ग्राहकांची तारांबळ उडालेली दिसून आली.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या