Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने पिके भुईसपाट

वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने पिके भुईसपाट

पंचाळे । Panchale (वार्ताहर)

वादळी वार्‍यासह रविवारी (दि.6) आलेल्या पावसाने पूर्व भागातील अनेक गावातील शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

काढणीला आलेली बाजरी, मक्यासारखी अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. कृषी खात्याने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

सध्या शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या बाजरीचे पिक काढणीला आले आहे.अनेक शेतकरी बाजरीच्या सोगनीलाही लागले आहेत. मक्याचे पीकही जोमदार आले असून सात ते आठ फूट उंच वाढले आहे. मक्याच्या बिट्याचे वजन ताटाला पेलवत नाही अशी अवस्था आहे.

त्यातच रविवारच्या पावसाबरोबर वेगवान वार्‍यामुळे अनेक शेतकर्‍यांची मक्याची पिके भुईसपाट झाली. बाजरीची पिकेही जमिनीवर आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना अर्धवटच सोंगणीची कामे करावी लागणार आहेत. वादळी वार्‍यामुळे वडांगळी-पंचाळे रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने झाडाचा अडथळा दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

या वादळासह आलेल्या पावसामुळे वडांगळी, डांबर नाला, देवपुर, दत्तनगर, पांगरी रोड परिसरातील अनेक विजेचे पोल पडले. त्यामुळे रात्रभर पंचाळे गावातील वीज पुरवठा बंद होता.

महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आज दिवसभर पोल दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला. कांद्यांच्या रोपांमध्ये पाणी साठल्याने अत्यंत महागडे बियाणे घेऊन टाकलेल्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक शेतकर्‍यांच्या मका, बाजरी बरोबर टोमॅटो, ऊस, सोयाबीनचेही मोठेे नुकसान झाले आहे .कृषी खात्याच्यावतीन

- Advertisment -

ताज्या बातम्या