Friday, April 26, 2024
Homeनगररेल्वेच्या भुयारी पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

रेल्वेच्या भुयारी पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

चांगदेवनगर येथील रेल्वे चौकीजवळ असलेल्या रेल्वे खात्याच्या भुयारी पुलाचे काही काम अद्यापही अर्धवट असल्यामुळे ळा पुलाचा वापर करून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

गेल्या तीन वर्षापासून या भुयारी पुलाचे काम सुरू आहे. सध्या पश्चिम बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम अद्यापही अपूर्ण आहे. भिंतीच्या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोखंडी गज वापरून सांगाडा उभा केलेला आहे. तसेच पूर्व बाजूला सुद्धा काही काम अर्धवट आहे.

पुणतांबा येथील स्टेशन रोडवरील रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे पुणतांबा मार्गे श्रीरामपूर व कोपरगाव मार्गे जाणारी वाहतूक रयत हायस्कूल जवळ बांधलेल्या नवीन गेट मधून वळविण्यात आली आहे. असे असले तरी बहुतांशी वाहतूक चांगदेवनगर मार्गे रेल्वेच्या भुयारी पुलाचा वापर करून केली होती. मात्र या मार्गावर रस्ता अरुंद असल्यामुळे कायमच वाहतुकीची कोंडी होते. त्यातच भुयारी पुलाचे कामही अर्धवट आहे.

सध्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. नुकतेच श्रीरामपूर-पुणतांबा दरम्यान नवीन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी सुद्धा झाली. मात्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवर जुन्या रेल्वे पुलाच्या समांतर नवीन पुलाचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दौंड मनमाड दुहेरी रेल्वेमार्ग प्रवाशांसाठी कार्यान्वित होण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या