रेल्वेची वाहतुक विस्कळीत

jalgaon-digital
1 Min Read

भुसावळ- Bhusawal :

कोकण रेल्वेच्या कारवार सेक्शनमधे मादुरे आणि पेरनेम स्टेशन दरम्यान सुरंगमध्ये भिंत पडल्यामुळे या खंडामधील वाहतूक सेवा पुढील आदेश पर्यंत रद्द करण्यात आली आहे. यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल तर दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहे.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र. ०२६१७ डाउन एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ही गाडी प्रस्थान स्थानकापासून ९ ते २० ऑगस्ट दरम्यान मडगाव, लोंडा, मिराज, पुणे, पनवेल, कल्याण मार्ग हजरत निजामुद्दीन स्टेशन जाईल. गाडी क्र. ०२६१८ अप हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ९ ते २० ऑगस्ट दरम्यान पनवेल, पुणे, मिराज, लोंडा, मडगाव मार्गे एर्नाकुलम पोहचेल.

गोवा एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट- गाडी क्र. ०२७८० अप हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दि.९ ते २३ ऑगस्ट दरम्यान हुबळी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ही गाडी लोंडा ते मडगांवपर्यंत रद्द राहिल. गाडी क्र. ०२७७९ डाउन मडगांव हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दि. ९ ते २३ ऑगस्ट दरम्यान हुबली स्थानकावरुन रवाना होईल ही गाड़ी मडगांव ते लोंडा दरम्यान रद्द राहिल .प्रवाशांनी हा बदल लक्षा घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *