Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशआता सहा तास बंद राहणार रेल्वे तिकीट बुकींग, कारण...

आता सहा तास बंद राहणार रेल्वे तिकीट बुकींग, कारण…

भारतीय रेल्वे (Indian Railways)ऑनलाईन तिकीट बुकींग संदर्भात एक महत्वाचा बदल केला आहे. येत्या १४ नोव्हेंबरपासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत रात्री ऑनलाईन तिकीट बुक (Rail Ticket)होणार नाही. रेल्वे आपल्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमला अपग्रेड करत आहे.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

- Advertisement -

कोरोनानंतर आता भारतीय रेल्वे पुन्हा रुळावर येत आहे. बंद केलेल्या १७०० गाड्या टप्प्याटप्पाने सुरु करत आहे. नवीन रेल्वेंची संख्या आणि अन्य डेटाला अपग्रेड करण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीने तिकीट बुक करता येणार नाही, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways)दिली.

एनसीबीचे पथक जळगावात : १५०० किलो गांजा जप्त

६ तास बंद राहणार PRS

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अपग्रेडची ही प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत PRS सिस्टीम बंद राहणार आहे. यात सहा तासातच्या दरम्यान तिकीट रिझर्वेशन, तकीट रद्द आणि गाड्यांविषयीची माहिती अशा सर्व सेवा बंद राहणार आहे. मात्र १३९ या क्रमाकांवर प्रवाशी रेल्वेसंबंधी विचारपूस करू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या