Thursday, April 25, 2024
Homeनगरमहिलेचे दीड तोळ्याचे गंठण ओरबडले

महिलेचे दीड तोळ्याचे गंठण ओरबडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दूध (Milk) आणण्यासाठी घराच्या बाहेर पडलेल्या महिलेच्या (woman) गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी ओरबडून (Chain Snatching) नेले. सोमवारी सकाळी आठ वाजता मल्हार चौक, रेल्वे स्टेशन (Railway Station) परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुजा आशिष भळगट (वय 32 रा. आनंदनगर, मल्हारचौक, रेल्वेस्टेशन) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

शरद पवारांची भूमिका योग्यच – ना. विखे

फिर्यादी या सोमवारी सकाळी आठ वाजता राहते घरातून नेहमीप्रमाणे गिरवले दुध यांचे दुकानात दुध घेण्याकरीता घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या मल्हार चौकाकडे जावून दूध घेवून पुन्हा घराकडे येत असताना आनंद किराणा दुकानासमोर अचानक दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण (Gold Chain) ओरबडले.

काँग्रेस बालेकिल्ल्याची जबाबदारी आ. राम शिंदे यांच्या खांद्यावर

फिर्यादीने आरडाओरडा केला असता तोपर्यंत तो चोरटा आयकॉन शाळेच्या दिशेने निघून गेला होता. फिर्यादी यांनी कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

नगर, दौंड, बारामती रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

- Advertisment -

ताज्या बातम्या