Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर-पुणे शटलसाठी रेल्वे रोकोचा प्रयत्न

नगर-पुणे शटलसाठी रेल्वे रोकोचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी

- Advertisement -

विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांच्या फौजफाट्याने आंदोलकांना प्रवेशद्वारतच अडवले. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. यामध्ये हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, संजय सपकाळ, मन्सूर शेख, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, संभाजी पवार, बहिरनाथ वाकळे, अशोक कानडे, जालिंदर बोरुडे आदी सहभागी झाले होते.

नगरमधून पुण्याला जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. रस्त्याने जाताना मोठा वेळ व पैसा खर्च होतो. या रेल्वे सेवेमुळे काही वेळेतच पुण्याला सुरक्षितपणे जाता येणार आहे. या प्रश्नासाठी दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्री व रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊ. तरी देखील प्रश्न न सुटल्यास थेट दिल्लीत आंदोलन करू.

– आ. संग्राम जगताप

- Advertisment -

ताज्या बातम्या