Thursday, May 9, 2024
Homeनाशिकरेल्वे प्रवासी संघाचा आंदोलनाचा इशारा

रेल्वे प्रवासी संघाचा आंदोलनाचा इशारा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकच्या नोकरदार, व्यावसायिक यांच्यासाठी मुंबईला जाण्या-येण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पंचवटी, राज्यराणी ( Panchavati & Rajyarani Express ) या रेल्वे गाड्यांना दररोजच विलंब होत आहे.

- Advertisement -

सकाळी आणि संध्याकाळी या गाड्या सुटत असल्याने मुंबईला नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणार्‍या नोकरदारांचो हाल होत आहे. त्यांचा पगार कट तर होतोच परंतु, कार्यालयातर्फे मेमोही मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पंचवटी एक्सप्रेस व राज्यराणी एक्सप्रेस मुंबईला जाताना दोन हप्त्यापासून उशिराने धावत आहेत. सायंकाळी मुंबईहून नाशिकला निघतानाही त्यांना उशीर होत आहे. पुरेशी झोप व जेवणाअभावी त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

मुंबईला गाड्या उशीरा पोहचत असल्याने खासगी व शासकीय कर्मचारी आपल्या कार्यालयात वेळेत हजेरी लाऊ शकत नाहीत. बायोमेटरीक करू न शकल्याने गैरहजरीचे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पगार कट होत असल्याने हातात पगार कमी येत असून सामान्यांचे बजेट कोसळू लागले आहे.

रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत राज्यराणीला देवळाली व दादर या स्थानकात थांबा द्यावा, दोन्ही गाड्या वेळेत चालवाव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचवटी एक्सप्रेस प्रवासी संघाचे बाळासाहेब केदारे, मासिक पासधारक वेल्फेअर संघटनेचे राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, कैलास बर्वे, संजय शिंदे, नितीन जगताप, दिपक कोरगावकर, सुदाम शिंदे, संतोष गावंदर, उज्वला कोल्हे आदींनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या