Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशभारतीय रेल्वेचेे खाजगीकरण होणार? केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले...

भारतीय रेल्वेचेे खाजगीकरण होणार? केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले…

नवी दिल्ली –

भारतीय रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही असे आश्वासन मंगळवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी

- Advertisement -

दिले आहे.

संसद अधिवेशनात लोकसभेत मंगळवारी विरोधकांनी रेल्वे खाजगीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता.

यावर रेल्वेमंत्री पीयुष गोयल म्हणाले, भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही. त्यामुळे भारतीय रेल्वे कोणत्याही खाजगी कंपनीच्या हाती कधीच सोपावली जाणार नाही.

परंतु भारतीय रेल्वेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने एकत्र मिळून काम केल्यास रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध केल्या जाऊन शकतात. तसेच देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र सरकारने यापूर्वीच भारतीय रेल्वे खाजगी कंपन्यांसोबत भागीदारी करत चालवण्याची योजना आखली आहे. परंतु केंद्राच्या या योजनेला देशभरातील विरोध पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे.

यावरच स्पष्टीकरण देताना रेल्वेमंत्री गोयल म्हणाले, भारतीय रेल्वेचे कधीही खाजगीकरण केले जाणार नाही. ही प्रत्येक भारतीयांची मालमत्ता आहे आणि ती तशीच राहील.

रेल्वे अपघातांसंबंधीची माहिती देताना गोयल म्हणाले, मार्च 2019 नंतर भारतातील रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देत आहोत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात (2019-2020) रेल्वे प्रवाशात कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती सांगण्यात मला आनंद होत आहे.

परंतु शेवटचा मृत्यू मार्च 2019 मध्ये झाला असल्याची माहितीही गोयल यांनी लोकसभेत दिली. तसेच केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात रेल्वे सुविधांसाठी तब्बल 2 कोटी 15 लाखांची गुंतवणूक केला आहे. याआधी 2019 -20 या आर्थिक वर्षात केंद्राने रेल्वेमध्ये 1 कोटी 15 लाखांची गुंतवणूक केली होती. तसेच केंद्राने भारतीय रेल्वेला भविष्यात अधिक अत्याधुनिक करण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 तयार केली असल्याचेही सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या