Tuesday, April 23, 2024
Homeनगररेल्वेरुळावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

रेल्वेरुळावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन याठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रेल्वे कर्मचारी यांच्याकडून घटनेची माहिती रेल्वे पोलीस यांना कळविण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर इसमाचा मृतदेह ताब्यात घेत श्रीरामपूर येथील शासकीय ग्रामिण रुग्णालय याठिकाणी आणण्यात आला. सदर इसमाचे वय अंदाजे 50 ते 55 असून अंगात जांभळा कलरचा शर्ट तसेच बर्मुडा पॅन्ट परिधान केलेली आहे.

जवळ पायातील चप्पल तसेच काठी आढळून आली आहे. सदरच्या व्यक्तीस जवळचे नातेवाईक मित्रमंडळी ओळखीचे असल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या