Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनांदगाव रेल्वे फाटक १० नोव्हेंबर पर्यंत बंद

नांदगाव रेल्वे फाटक १० नोव्हेंबर पर्यंत बंद

नांदगाव | Nandgoan

नांदगाव शहरलगत असलेल्या मध्य रेल्वेगेटजवळ (114) अंडरपासचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने दि.5 /10 नोव्हेंबर पर्यंत दिवसरात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

याचा फटका या मार्गावरुन जाणार्‍या असंख्य वाहन धारकांना बसणार आहे.दिवसरात्र पाच दिवस रेल्वेगेट असल्याने शहरातील वाहतूकीचा खोळंबा होणार आहे.

नांदगाव शहरलगत असलेल्या मध्य रेल्वेच्या गेट (क्रमांक -114) जवळ अंडरपासचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने गुरुवार (दि.5 नोव्हें. ते 10 नोव्हें.) पर्यंत रेल्वेगेट बंद रहणार आहे.

शहरातील रेल्वेगेट बंद.असल्याने वाहतूकीचा खोळंबा होणार असुन नांदगाव शहरातील वाहतुक रेल्वे उडाण पुलाकडून वळविण्यात आल्याने अडीच किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे.

नांदगाव शहरातील रेल्वेगेट बाहेरील आनंदनगर, कैलासनगर,रेल्वे कॉलनी ,एसटी कॉलनी स्वामी विवेकानंद नगर, आदी भागातील रेल्वेगेट बंद केल्याने या रस्त्यावरील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

दरम्यान (दि.०५) नोव्हेंबर पासून रेल्वेगेट बंद करून (114) अंडरपासचे काम बंद असल्याचे निदर्शनास येत असून रेल्वेगेट बंद का? करण्यात आला आहे. असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या