Friday, April 26, 2024
Homeजळगावमालधक्का होणार स्थलांतरित !

मालधक्का होणार स्थलांतरित !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील दाट वस्ती परिसरातील भोईटेनगर येथील रेल्वे माल धक्कामुळे जवळपाच्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास

- Advertisement -

सहन करावा लागत असल्याने हा मालधक्का स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी मनपाचे महापौर भारती सोनवणे यांनी भुसावळ येथे रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अनेक वर्षांपासून हा मालधक्का भोईटे नगर येथे कार्यान्वित आहे. या माल धक्क्यावर सिमेंटचे गोडावून देखील आहे. यामुळे सकाळ पासून संध्याकाळी व उशीरापयर्र्त सिमेंटची वाहतूकही सुरू असते. यामुळे हवेत सिमेंटचे धूलीकण मोठ्या प्रमाणात असतात.

परिणामी परिसरातील नागरिकांना याचा त्रास होवू लागल्याचे निदर्शनास आले होते. महाराष्ट्र राज्य प्रदुषण महांडळाद्वारे दोन वेळा हवेतील प्रदुषणाची चाचणी केली असता दोन्ही वेळेस वातावरणातील प्रदुषण पातळी धोक्याच्या पातळीच्याही पुढे आहे असे अहवालात म्हटले आहे.

या करीता व परिसरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने शहर मनपाने महासभा ठराव क्र. 292 हा दि. 12 ऑगस्ट 2020 च्या सभेत पास करण्यात आला होता.

मालधक्का स्थलांतरीत करणेबाबत त्या सभेत सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती. तसेच याबाबत संबंधित नगरसेवक सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे 2 नोव्हेंबर रोजी सुध्दा विनती केली आहे व याबाबत पाठपुरावा केलेला आहे.

तरी या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करुन हा मालधक्का लवकरच शहराबाहेर स्थलांतरीत करण्यात यावा व याबाबत उचित कार्यवाही व्हावी अशीही मागणी पत्रकाद्वारे महापौर भारती सोनवणे यांनी रेल्वेचे डी आर एम यांना केली आहे.

उपमहापौरांनी केला होता पत्रव्यवहार

मालधक्का स्थलांतरीत करण्याबाबत माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनीही पाठपुरावा केला होता. तसेच पत्रदेवून वारवार आयुक्त तसेच डी आर एम यांच्याकडे मागणी केली होती.

येथे असलेल्या मालधक्याबाबत भोईटेनगर परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आणले होते. अवजड अशी सिमेंटची वाहतुकीची वाहनांमुळे रस्त्यांवर सिमेंटचे कण हे पादचारी तसेच वाहनधारकांच्या नाकातोंडात जात होते.

तरी या मालधक्क्याचा अनेक नागरिकांना त्रास होवू लागला होता. यामुळे हा मालधक्का इतरत्र हलविण्यात यावा अशी शहरवासीयांचीही मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या