Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यातील 'या' पाच रेल्वे फाटकांवर होणार 'उड्डाणपूल'

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ पाच रेल्वे फाटकांवर होणार ‘उड्डाणपूल’

देवळाली कॅम्प | वार्ताहर Deolali Camp

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहेत. या फाटकांवर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे….

- Advertisement -

मंत्रालयाने परवानगी दिली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी आज दिली.

जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहेत. यापैकी भगूर येथे रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी यापूर्वीच उड्डाणपुल उभारण्यात आला असून लवकरच उर्वरित १३ पैकी ५ फाटकांवर देखील (रेल्वे क्रॉसिंग) उड्डाणपुल अथवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे.

याशिवाय उर्वरित ८ ठिकाणी देखील उड्डाणपूल अथवा अंडरपास बांधण्यालादेखील मंजूरी मिळणार असून यामुळे रेल्वे फाटकांवरील अपघात तसेच नासाडी इंधन बचतीला देखील मदत होणार आहे. या पाच ठिकाणी उड्डाणपुल अथवा अंडरपास कामासाठी लवकरच निधी मंजूर होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी असलेल्या रस्त्यांवर रेल्वे फाटक बसविले जातात. मात्र येणाऱ्या – जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे येथे बऱ्याचदा लांबचलांब वाहनांच्या रांगा लागतात. याशिवाय रेल्वे येण्यासाठी व जाण्यासाठी लागणाऱ्या काळावधीत दहा मिनीटाहून अधिक काळासाठी हे रेल्वे फाटक बंद करण्यात येते.

बऱ्याचदा वाहनचालक आपली वाहने बंद करत नसल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणात इंधनाची नासाडी होत असल्याचा अनुमान केंद्राच्या एका संशोधनात निर्दशनास आले आहे.

त्यामुळे केंद्राने ज्या – ज्या ठिकाणी रेल्वे क्राँसिग आहेत व जेथे – जेथे शक्य आहे त्याठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास तयार करुन वाहने येण्याजाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अंतर्गत नाशिक लोकसभा मतदार संघातील १३ रेल्वे फाटकांच्याठिकाणांपैकी ५ ठिकाणी उड्डाणपुल उभारयाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याचे पत्र काल रेल्वे बोर्डचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी खा. गोडसे यांना दिले आहे.

दरम्यान यापूर्वी भगूर येथे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित १३ पैकी पाच ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपासच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

खालील रेल्वे क्रॉसिंगवर उभारणार उड्डाणपुल / अंडरपास

१) नाशिकरोड येथील (गेट क्र. ९०) वर रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

२) देवळाली येथील (गेट नं. ८५) वर रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल उभारणार.

३) ओढा येथील (गेट नं. ९२) येथे रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अंडरपासची सोय करण्यात येणार आहे.

४) अस्वली येथील (गेट नं. ८३ डी. एन.) येथे रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अंडरपास उभारणार.

५) लहावित येथील (गेट नं. ८४/१) येथे रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अंडरपास उभारणार

याठिकाणीदेखील लवकरच होणार ओव्हरब्रिज किंवा अंडरपास

घोटी गेट नं. ८०,

घोटी गेट नं. ८१,

अस्वली गेट नं. ८४,

लहावित गेट नं. ८४ एयुपी

देवळाली गेट नं. ८६

देवळाली गेट नं. ८७

नाशिकरोड गेट नं. ८८

ओढा गेट नं. ९३

- Advertisment -

ताज्या बातम्या