Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी विद्यापीठाचा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

राहुरी विद्यापीठाचा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सेवानिवृत्तीच्या संदर्भातील कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून त्याची पेन्शन वेळेत मिळावी,

- Advertisement -

यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक रामेश्वर काशिनाथ बाचकर (वय 50) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला. त्याला सहाय्यक अधिक्षकांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याला जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे राहुरी विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने सेवानिवृत्तीचे संदर्भातील कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून त्यांची पेन्शन वेळेत मिळावी यासाठी आरोपी बाचकर याच्याकडे मागणी केली असता त्याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. यावरून तक्रारदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे याबाबत तक्रार केली. त्यावरून संबंधित विभागाने सहाय्यक अधिक्षकांच्या कार्यालयात सापळा रचून बाचकर यास रंगेहाथ पकडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या