Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर भीषण अपघात

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर भीषण अपघात

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर (Rahuri Shanishinganapur Road) उंबरे-माळवाडी (Umbare-Malwadi) येथे भीषण अपघात (Accident) होऊन पाच वर्षाच्या मुलीसह पाच ते सहाजण गंभीररित्या जखमी (Injured) झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisement -

राहुरीकडून (Rahuri) सोनईच्या (Sonai) दिशेने चाललेल्या एमएच 12 जीवाय 3818 या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा (Riksha) एमएच 16 एजे 8748 ला पाठीमागून जोरदार धडक (Hit) दिली. ही धडक (Hit) इतकी जोरात होती की, रिक्षाचे जागीच दोन तुकडे झाले. रिक्षात बसलेले प्रवासी त्यात तीन महिला एक पाच ते सहा वर्षाची मुलगी व एक पुरुष असे गंभीररित्या जखमी (Injured) झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी (Rahuri) येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला.

हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, दोघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर इतर गंभीर जखमी (Injured) झाले आहेत उंबरे गावातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ राहुरी (Rahuri) येथील रुग्णालयामध्ये (Hospital) हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीची मदत करणारे युवक भाऊराव कवडे, संदीप गायकवाड, अरुण गायकवाड, पप्पू कनगरे, सागर गायकवाड, गोरख धोत्रे, अण्णा गायकवाड, राजू वैरागर व ग्रामस्थ उपस्थित होते. राहुरी शनिशिंगणापूर (Rahuri Shanishinganapur Road) या रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. वेळोवेळी उंबरे ग्रामपंचायतीने गतीरोधक बसविण्याची मागणी केली असून आजपर्यंत कुठेही गतीरोधक बसविले नाहीत. रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून अतिक्रमण करणार्‍याला संबंधित अधिकार्‍यांचे आशीर्वाद आहेत की काय? असा सवाल संतप्त वाहनचालकांनी विचारला आहे.

या मार्गावरून दररोज हजारो भाविक शिर्डी-शनिशिंगणापूर (Rahuri Shanishinganapur Road) दर्शनासाठी जातात. त्यांच्या वाहनांची गतीही मोठ्या प्रमाणात असते. गावाच्या ठिकाणी व मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी गतीरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज या रस्त्यावर कुठे ना कुठे अपघात (Accident) होतच असतात. अनेक वेळा आंदोलन करूनही अद्याप या रस्त्यावर कुठेही गतीरोधक बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शनिशिंगणापूर या देवस्थानकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने चालत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावर लवकरात लवकर गतीरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या