Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहुरी मतदारसंघातील विकास कामांसाठी 5 कोटी मंजूर - ना. तनपुरे

राहुरी मतदारसंघातील विकास कामांसाठी 5 कोटी मंजूर – ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास विभाग व पंचायत राज विभाग 25,15 अंतर्गत राहुरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मूलभूत सुविधा कामांचे पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचे ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, ना. तनपुरे यांच्या प्रयत्नातून राहुरी विधानसभा मतदारसंघातील माहू ते केकताई बारागाव नांदूर डांबरीकरण 50 लक्ष, कात्रड वांबोरी शिवरस्ता, गाव कात्रज रस्ता डांबरीकरण 35 लक्ष, सोनगाव अंतर्गत सात्रळ चौक ते धानोरे घाटरस्ता डांबरीकरण 20 लक्ष, तांदुळवाडी गावठाण आयटीआय ते जुना राहुरी शेळके रस्ता डांबरीकरण 35 लक्ष, वडारवाडी ता. नगर वैद्य कॉलनी रस्ता काँक्रिटीकरण 20 लक्ष, तांभेरे मराठी शाळा ते चिंचोली फाटा रस्ता डांबरीकरण 25 लक्ष, कोंढवड ते जुना पिंप्री अवघड रस्ता 15 लक्ष, बा. नांदूर ते मल्हारवाडी शिवरस्ता खडीकरण 35 लक्ष, बारागाव नांदूर, जांभळी, डिग्रस नर्सरी नदीवरील रस्ता काँक्रिटीकरण व सीडी वर्क करणे 25 लक्ष, बारागाव नांदूर ते बोरटेक बनरस्ता मजबुती व डांबरीकरण 30 लक्ष, बा. नांदूर गावठाण हनुमान मंदिर पेव्हींग ब्लॉक बसविणे 5 लक्ष, कनगर दिवे वस्तीवर समाज मंदिर बांधणे 25 लक्ष, डिग्रस नगर-मनमाड रोड ते ज्ञानगंगा हायस्कुल रस्ता खडीकरण करणे 10 लक्ष, देसवंडी पवार वस्ती ते गिते वस्ती मजबुती व डांबरीकरण करणे 25 लक्ष, शिलेगाव गावठाण ते करपरावाडी रस्ता मजबुती व डांबरीकरण 40 लक्ष, म्हैसगाव ते केदारेश्वर केटीवेअरवर रस्ता 3 लक्ष, शिराळ ता. पाथर्डी मुळेवस्ती ते कडगाव रस्ता मजबुती व डांबरीकरण करणे 25 लक्ष, कनगर जुना रस्ता ते वडाचे लवण रस्ता मजबुती व डांबरीकरण करणे 25 लक्ष, वावरथ खिलारवस्ती येथे सभामंडप बांधणे 12 लक्ष, वावरथ येथील कळणवतीची वाडी ते पुनोबाचीवाडी रस्ता मजबुती व डांबरीकरण करणे 25 लक्ष, कनगर येथील मुस्लीम कब्रस्थान, स्मशानभूमी विकास करणे 5 लक्ष, अशी कामे मंजूर झाली आहेत.

तसेच मतदारसंघातील अजूनही कामे प्रस्तावित आहेत. मात्र, करोनाच्या महामारीमुळे प्रतिक्षेत आहेत. करोनाचा कहर कमी झाल्यास ही कामे अग्रक्रमाने सुरू होणार असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या