Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशराहुल गांधींचा माेदी सरकारवर हल्ला

राहुल गांधींचा माेदी सरकारवर हल्ला

भारतात करोनाची परिस्थिती अटाेक्यात येत नसल्याने कांॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकावर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कराेनासंदर्भात माेदींचे भाषण आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या