Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय'अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत'

‘अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत’

दिल्ली | Delhi

हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एका योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती.”

14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द

हाथरस घटनेचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे केली होती. त्यानुसार तपास सीबीयायकडे सुपूर्द करण्यात आला आहे.हाथरस प्रकरण नीट हातळले नसल्याचा आरोप योगी सरकारवर होत आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनाने मीडिया आणि विरोधी पक्षाशी अरेरावी केल्यावरूनही योगी सरकार टीकेचे धनी बनले होते. पीडितेचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच राजकीय नेते आणि माध्यमांना हाथरस जिल्ह्यात येण्यास बंदी घातली होती. कायदा सुव्यवस्थेचे कारण प्रशासनाने पुढे केले होते. तसेच जिल्ह्यात आणि पीडितेच्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आम्हाला दम दिल्याचा आरोपही पीडित कुटुंबियांनी केला होता.राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यावरूनही राज्य सरकारवर टीका झाली होती. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते. उत्तर प्रदेशसह देशभरात बलात्काराच्या घटनेविरोधात आंदोलन झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या