Thursday, April 25, 2024
Homeनगरराहाता सोसायटी क्र. दोनच्या 13 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल

राहाता सोसायटी क्र. दोनच्या 13 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल

राहाता |वार्ताहर| Rahata

विविध कार्यकारी सोसायटी क्रमांक दोन निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी 13 जागांसाठी 25 नाम निर्देशन अर्ज दाखल झाले असून भटक्या विमुक्त जाती जमाती व अनुसूचित जाती जमाती या जागांकरिता प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही जागेकरिता 2 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. सोसायटी क्रमांक 2 मध्ये एकूण सभासद संख्या 761 असून त्यात मतदानास पात्र सभासद 301 आहेत.

- Advertisement -

सोसायटी मध्ये 13 सदस्यांचे संचालक मंडळ असून सर्वसाधारण खातेदार, कर्जदार प्रतिनिधी 8 अनुसूचित जाती जमाती 1, महिला 2, इतर मागास 1, भटक्या विमुक्त जाती, जमाती 1 असे एकूण 13 सदस्यांची कार्यकारिणी आहे. 1 फेब्रुवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वसाधारण जागेसाठी ज्ञानेश्वर बाबुराव सदाफळ, राजेंद्र दगू कार्ले, अनिता भास्कर बोठे, अंबादास विश्वनाथ गाडेकर, चंद्रभान जानबा मेहेत्रे, शुकलेश्वर नामदेव शेळके, बाबासाहेब गमाजी मेहेत्रे, रावसाहेब विठ्ठल लांडगे, गंगाधर मुरलीधर बोठे, बाबासाहेब नामदेव कार्ले, भाऊसाहेब वारूबा मेहेत्रे, अविनाश त्रिंबक बनकर, शशिकांत बाळासाहेब काळे, अलका चांगदेव गाडेकर, चांगदेव यशवंत गाडेकर असे एकूण 15 अर्ज दाखल झाले आहे.

महिला राखीव जागेसाठी तुळसाबाई पांडूरंग गाडेकर दोन अर्ज, नर्मदाबाई रामचंद्र सदाफळ, अनिता भास्कर बोठे, अलका चांगदेव गाडेकर, राधाबाई रामनाथ गाडेकर एकूण 6 अर्ज इतर मागास वर्ग जागेसाठी संजय रामचंद्र सदाफळ, बाळासाहेब रामनाथ गाडेकर 2 अर्ज भटक्या विमुक्त जाती जमाती जागेसाठी सर्जेराव रघुनाथ भगत यांचा एकमेव अर्ज दाखल तर अनुसूचित जाती जमाती जागेसाठी नारायण चंद्रभान यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने भगत व यादव या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

2 फेब्रुवारी रोजी झालेल्या छाननीत नाम निर्देशन भरलेल्या 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असून 18 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर के.जाधव तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सचिव अनिलकुमार मेनगर यांनी सांगितले. राहाता शहरात विविध विकास कार्यकारी सोसायटी क्रमांक 1 व 2 या दोन सोसायट्या आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार अत्यंत पारदर्शी व उत्कृष्टपणे सुरू आहे. सोसायटीचे मार्गदर्शक गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, सोपानकाका सदाफळ, अ‍ॅड .रघुनाथ बोठे. सभापती भाऊसाहेब जेजुरकर, राजेंद्र कार्ले, किशोर बोठे तसेच शहरातील इतर नागरिकांच्या माध्यमातून सोसायटी क्रमांक 1 ची अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या इमारतीचे नूतनीकरण करून त्याठिकाणी उत्पन्न वाढविण्यासाठी गाळे निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सोसायटी क्रमांक 2 याठिकाणी धान्य साठविण्यासाठी भव्य गोडाऊनची उभारणी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अल्पदरात भाडेतत्त्वावर गाळ अशा विविध योजना सोसायटीच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची घोडदौड यशस्वीरीत्या सुरू असून. पारदर्शी कारभार सभासदांचे हिताचे निर्णय तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी विविध गाळे उभारून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. मतदारांनी पुन्हा संधी दिली तर आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक अधिक प्रयत्न करण्याचे मानस आहे.

– अ‍ॅड. रघुनाथ बोठे, राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या