Friday, April 26, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत 13124 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 13124 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी 13124 गोणी कांद्याची आवक झाली तर डाळिंबाच्या 5946 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1800 ते 2400, कांदा नंबर 2 ला 1250 ते 1750, कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

गोल्टी कांदा 1400 ते 1600 व जोड कांदा 300 ते 500 रुपये भाव मिळाला.डाळिंबाची 5946 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 121 ते 175 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या