Friday, April 26, 2024
Homeनगरराहाता नगरपरिषदेकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत 25 लाख निधी वितरीत

राहाता नगरपरिषदेकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत 25 लाख निधी वितरीत

राहाता |वार्ताहर| Rahata

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राहाता नगरपरिषदेमार्फत 25 लाखांचा निधी वितरीत केला. उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असून नागरिकांनी तात्काळ घरकुलाचे काम सुरू करून या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासक तुषार आहेर यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार आहेर यांनी सांगितले, राहाता नगरपरिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 122 वैयक्तीक घरकुलाचे बांधकाम सुरू असून 50 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित घरकुलाचे काम लवकरच पूर्ण होईल. नगरपरिषदेने आत्तापर्यंत 66 घरकुल धारकांना 1 कोटी 23 लाख इतका निधी वितरीत केला आहे. यामध्ये 14 लाभार्थ्यांना पहिला हप्ता 8 लाख 40 हजार तसेच दुसरा हप्ता 5 लाख 40 हजार व 25 लाभार्थ्यांना 4 था हप्ता पूर्ण झालेल्या घरकुल धारकांना प्राप्त निधीपैकी घरकुल लाभार्थ्यांचे 10 लाख इतकी रक्कम लाभार्थ्यांचे खात्यावर वर्ग केली.

या सर्व खात्यावर एकूण 23 लाख 80 हजार इतकी रक्कम वर्ग केली असून राहाता नगरपरिषदेमार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेत ऑनलाईन प्रणालीचा वापर करून पारदर्शकता ठेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार आहेर यांनी केले आहे.

ना.राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाची घरकुल योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना आंबेडकरनगर येथे 148 घरकुल फक्त 34 हजारांत सर्व सोयीयुक्त बांधून दिले. उर्वरित 48 घरकुलांची कामे सुरू आहे. या योजना ना.विखे पाटील यांनी शहरातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनीही शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम हाती घेऊन शहरातील विविध रस्ते, लाईट, स्वच्छता आदी विविध विकास कामांना गती देण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या