Friday, April 26, 2024
Homeनगरराहात्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला

राहात्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला

राहाता |प्रतिनिधी| Rahata

कोविडच्या (Covid 19) संभाव्य तिसर्‍या लाटेच्या (third wave) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून (district administration) करोना नियमावलीचे काटेकोर पालन (Strict adherence to the Corona Rules) करण्याचे निर्देश (Instructions) स्थानिक प्रशासनाला दिले असताना नागरिक मात्र काळजी घेताना दिसत नाहीत. राहाता शहरात (Rahata City) नागरिकांची बेफिकीरी वाढत आहे. तालुक्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काळजी घेतली नाही तर करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी शासन व प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र दुकानात खरेदीसाठी जाताना ग्राहकांकडून सोशल डिस्टेंन्स (Social distance) पाळले जात नाही. मास्कचा वापर केवळ दिखाव्यासाठी केला जात आहे. विनामास्क फिरणे, मास्क असेल तर तो नाक आणि तोंडाच्या खाली घेऊन संवाद साधण्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळत आहे. दुकानदार व तेथील कर्मचारीही विनामास्क वावरत आहेत. लग्न समारंभ तसेच इतर सोहळ्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. जणू काही हे सर्व करोनाला निमंत्रण देतात का असे चित्र सध्या दिसत आहे.

शहरातील चितळी रोडवर दररोज भाजीपाला खरेदी विक्रीसाठी गर्दी होत आहे. लहान मुलेही भाजीपाला विक्री करताना विनामास्क दिसून येत आहे. याच रस्त्यावर व्यापारी संकुल असल्याने तेथील गर्दी व भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. नगरपालिका प्रशासनाने बाजारतळ अथवा चौकातील मोकळ्या जागेत भाजीपाला, फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल जात आहे. तालुक्यात सध्या 197 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात मंगळवारी 16 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या काहीशी कमी झाली असली तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या