Thursday, April 25, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 38 तर शहरात सर्वाधिक 26 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 38 तर शहरात सर्वाधिक 26 करोनाबाधित रुग्ण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 38 जणांना करोनाची लागण झाली असून दिवसभरात 141 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत. सर्वाधीक रुग्ण राहाता शहरात वाढले

- Advertisement -

असून शिर्डी येथील साई आश्रम फेज 2 कोव्हिड सेंटर हाऊफुल्ल झाल्याने उद्यापासून दुसरी इमारत ताब्यात घ्यावी लागणार आहे.

तालुक्यात करोनाच्या रुग्णांची वाढ सुरू असून आज दिवसभरात तालुक्यात 38 करोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या 141 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून राहाता शहर 26 रुग्ण, कोल्हार 6 जण, शिर्डी 3 जण, लोणी खुर्द 1 जण, चितळी 2 जणांचा समावेश आहे.

तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंतेची बाब समोर येत आहे. तालुक्यातील रुग्णांवर शिर्डी येथील कोव्हिड सेंटर मध्ये उपचार केले जात असून साई आश्रम फेज 2 या इमारतीत 120 रुग्णांवर उपचार सुरू असून यात 6 महिन्यांच्या बालकापासून 90 वर्षांच्या वृध्दांचा समावेश आहे.

कोव्हिड सेंटरची ही इमारत फुल्ल झाल्याने उद्या दुसरी इमारत ताब्यात घेऊन तेथे रुग्णांवर उपचार सुरू केले जातील, अशी माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

शिर्डीत साई बाबा संस्थानचे कोव्हिड रुग्णालय सुरू करावे ,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात असून सरकारने केवळ घोषणा केली असली तरी अद्याप कार्यवाही होत नसल्याने गंभीर रुग्णांना नगर, नाशिक, पुणे येथे न्यावे लागत आहे. शिर्डीतच कोव्हिड रुग्णालय सुरू झाल्यास नागरिकांची ससेहोलपट थांबेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या