Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 69 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 69 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 21 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहेत. काल 22 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 69 वर जाऊून पोहोचली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20928 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20859 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्या रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 10 तर अँटीजेन चाचणीत 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील दाढ बुदु्रक-01, लोणी बुद्रुक-01, गोगलगाव-01, कोर्‍हाळे-01, कोल्हार-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, निमगाव-01, पिंपळवाडी-01, वाकडी-09 असे 18 तर शिर्डी-00, राहाता-02 बाहेरील तालुक्यातील 01 असे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची (Corona Positive) संख्या 21 असून 22 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 69 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (active Patient) दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या