Sunday, May 5, 2024
Homeनगरराहाता चौक ते 15 चारी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू

राहाता चौक ते 15 चारी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू

राहाता |वार्ताहर| Rahata

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी तात्काळ राहाता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते 15 चारी शीव चितळी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत खडी व मुरूम टाकून बुजवण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांनी ना. विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

राहाता शहरापासून चितळी गावाकडे जाणार्‍या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने राहाता परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. मागील आठवड्यात या रस्त्यावरून जाणार्‍या युवकाची खड्डा चुकवण्याच्या नादात मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सदर रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राहात्यातील युवा कार्यकर्ते राहुल सदाफळ यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला सदर रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यासाठी सांगावे अशी विनंती केली होती.

ना. विखे पाटील यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वरपे यांना तात्काळ खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या. ना. विखे पाटील यांच्या सूचनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते 15 चारी शीव या पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांनी ना. विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ राहाता चौक ते 15 चारी शीव रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे खडी व मुरूमाने बुजवावेत अशी सूचना बांधकाम विभागाला केली. त्यामुळे बुधवारी खड्डे बुजवण्याची कामे तात्काळ सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– राहुल सदाफळ

- Advertisment -

ताज्या बातम्या