Saturday, April 27, 2024
Homeनाशिकयंदा रंगपंचमीला रहाडी उत्सव राहणार बंद

यंदा रंगपंचमीला रहाडी उत्सव राहणार बंद

पंचवटी । Panchavti

रंगपंचमी आली की, पेशवेकालीन रहाडीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पंचवटीतील शनिचौक, दिल्ली दरवाजा, तांबट लेन, तिवंधा चौक व दंडे हनुमान मित्रमंडळाची पेशवेकालीन रहाड असून दरवर्षी या रहाडीत मोठया उत्साहात रंगाची उधळण होत असते.

- Advertisement -

मात्र यंदाच्या वर्षी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातल्याने वरिल सर्व रहाड बंद ठेवण्याचा निर्णय मित्रमंडळांनी घेतला असून कमी प्रमाणात रंग खेळा व करोना संसर्ग टाळा अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

.पेशवेकालीन रहाडीत दरवर्षी रंगाची मुक्त उधळण होत असते. नाशिककरांमध्ये रहाडीचे आकर्षक कायम आहे. मागील वर्षी करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

मात्र तत्पूर्वीच रंगपंचमीचा उत्सव साजरा झाला होता. गत वर्षी रहाडीत डुंबून रंग खेळण्याचा आनंद रंगप्रेमींना घेता आला होता. पण सध्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी काही निर्बंध घातले आहे. याचा परिणाम रंगपंचमी उत्सवावर दिसून येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर शनिचौकासह इतर रहाड यावर्षी न खोलण्याचा निर्णय घेतला आहे. रहाडी बंद ठेवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. तसेच रहाडीच्या येथे करोना सुरक्षा उपाय़ योजनांची जनजागृती केली जाणार आहे.

रहाडित उतरुन रंग खेळण्याची मौज काही अौरच असते. पण यंदा करोना संकट लक्षात घेत‍ा रहाडी न खोलण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. आज जर आपण करोनापासून सुरक्षित राहिले तर भविष्यात असे आंनदाचे अनेक क्षण साजरे करता येईल. नागरिकांनिहि मोठया प्रमाणात रंग खेळण्याचा अट्टाहास करु नये.

– संतोष भोरे, सरदार चौक मित्रमंडळ

शासनाने रंगपंचमीवर निर्बंध घातले आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये हा मुख्य उद्देश आहे. त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असून रहाड खोलली जाणार नाही. रहाडीच्या जागेवर करोना सुरक्षा उपाय योजना फलक लावून जनजागृती केली जाईल.

– बबलू शेलार, दंडे हनुमान मित्र मंडळ

प्रशासनाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असून आम्ही रंगोत्सव रद्द केला आहे. रंग खेळायला जो उत्साह असतो तोच उत्साह लसीकरणाबाबत ठेवा. जेणेकरुन तुम्ही व तुमचा परिवार करोनापासून सुरक्षित राहिल.

– बबलू खैरे, पंचवटी ब्लाॅक अध्यक्ष काॅग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या